धक्कादायक ! पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यासाठी आलेल्या तरुणीवर महिला पोलिस अधिकाऱ्याची मारहाण; बॅज फेकल्याचा आरोप

Spread the love

धक्कादायक ! पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यासाठी आलेल्या तरुणीवर महिला पोलिस अधिकाऱ्याची मारहाण; बॅज फेकल्याचा आरोप

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई – दक्षिण मुंबईतील व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. फसवणुकीची तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या एका तरुणीवर महिला पोलिस उपनिरीक्षकाने मारहाण केली आणि तिच्यावर नेमप्लेटसह बॅज फेकल्याचा आरोप आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

तक्रारदार तरुणी फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात आली होती. मात्र, ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला. यावेळी तरुणीच्या सोबत्याने मोबाईलवर संपूर्ण संभाषण रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. हे पाहून पोलिस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे संतापल्या आणि अचानक राग अनावर करत नेमप्लेटसह बॅज काढून फेकला.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस विभागात खळबळ माजली आहे. डीसीपी गर्ग यांनी घटनेची चौकशी सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे सोपवली असून तपास सुरु आहे.

सोशल मीडियावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “काही अधिकारी गणवेशाचा गैरवापर करतात, पण सर्वच तसे नाहीत,” तर दुसर्‍याने म्हटले, “जनतेचे रक्षण करायला असलेले पोलिसच भय दाखवत असतील तर विश्वास कुठे राहील?”

या घटनेमुळे मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon