पंतप्रधान मोदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त “फिट इंडिया” नमो महा मॅरेथॉनचे भव्य आयोजन
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार तमिळ सेलवन यांच्या वतीने “फिट इंडिया” महा मॅरेथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मुंबईत कॅन्सर हॉस्पिटल स्थापन करण्याची मागणीही केली. ही मॅरेथॉन २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० वाजता वडाळा न्यू कफ परेड (लोढा) येथून सुरू झाली. सुमारे ३ किमीच्या मार्गावरून धाव घेत स्पर्धा न्यू कफ परेड – जीटीबी मोनोरेल स्थानक – मक्कावाडी जंक्शन – जीटीबी रेल्वे स्थानक – सायन हॉस्पिटल जंक्शन – गांधी मार्केट मार्गे माटुंगा सर्कल (महेश्वरी उद्यान) येथे संपन्न झाली.
कार्यक्रमात हजारो भाजपा कार्यकर्ते व सायन कोळीवाडा मतदारसंघातील नागरिक सहभागी झाले. या महा मॅरेथॉनचा मुख्य उद्देश असा संदेश देणे होता की, जसे मोदीजी ७५ वर्षांच्या वयातही ऊर्जेने व फिटनेसने देशाची सेवा करत आहेत, तसेच प्रत्येक नागरिकानेही निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याची प्रेरणा घ्यावी. यासोबतच पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गतही नमो मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थी, खेळाडू, स्थानिक नागरिक, महिला व पुरुष यांनी उत्साहाने भाग घेत धावण्याच्या माध्यमातून कॅन्सर जनजागृती, आरोग्याचे महत्त्व व निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री मा. श्री मंगल प्रभात लोढा आणि भाजपा मुंबई अध्यक्ष मा. श्री अमित सटम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.