खाकी वर्दीतील देवमाणूस, युथ आयकॉन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३, कल्याण, खाकी वर्दीतील देवमाणूस आणि तरुणांचा प्रेरणास्थान मा. श्री. अतुल झेंडे यांचा वाढदिवस कल्याणमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अतुल झेंडे यांनी कारकिर्दीत पोलीस सेवेला दिलेली नवी दिशा, तरुणांसाठी निर्माण केलेली प्रेरणा आणि समाजातील प्रामाणिक न्यायनिष्ठ सेवा हे खऱ्या अर्थाने आदर्शवत ठरले आहे. कठीण प्रसंगात घेतलेले निर्णय, जनतेच्या सुरक्षिततेसाठी केलेली निस्वार्थ धडपड आणि युवकांना योग्य मार्गदर्शन देण्याची त्यांची वृत्ती समाजातील प्रत्येकासाठी दीपस्तंभ ठरली आहे.
अतुल झेंडे यांच्या कार्यामुळे पोलीस वर्दीचा सन्मान अधिक उंचावला आहे. खाकी वर्दी केवळ शिस्तीचे प्रतीक नसून माणुसकी, संवेदनशीलता आणि आदर्श या मूल्यांची जिवंत प्रतिमा आहे, हे त्यांनी आपल्या कार्यशैलीतून सिद्ध केले आहे.
पोलीस दलात त्यांचा उल्लेख ‘सिंघम’ म्हणून केला जातो. रायगड जिल्ह्यातील त्यांची कारकिर्द विशेष गाजली, तर कल्याण डोंबिवली परिसरात त्यांनी गुन्हेगारांवर वचक बसविण्यात यश मिळविले. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे समाजातील पीडित नागरिक हक्काने त्यांच्याकडे समस्या व तक्रारी घेऊन जातात.
याशिवाय वाढदिवसाच्या कार्यक्रमात समाजातील विविध घटकातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी दैनिक पोलीस महानगर परिवाराकडून कार्यकारी संपादक प्रकाश संकपाळ, महेंद्र उर्फ अण्णा पंडित, सहसंपादक चंद्रप्रकाश मौर्या, प्रतिनिधी सुधीर गुजर, पांडुरंग कुंभार व इतर उपस्थित होते. झेंडे साहेब यांना येणारे वर्ष अधिक यश, उत्तम आरोग्य आणि नवीन कार्यसिद्धी लाभो, अशी शुभेच्छा सर्व उपस्थितांनी व्यक्त केली.