अंधेरी पोलिसांची मोठी कामगिरी; मोबाईल शॉप फोडून चोरी करणारे सराईत गुन्हेगार अटकेत, चोरीस गेलेली १२३ घड्याळे हस्तगत

Spread the love

अंधेरी पोलिसांची मोठी कामगिरी; मोबाईल शॉप फोडून चोरी करणारे सराईत गुन्हेगार अटकेत, चोरीस गेलेली १२३ घड्याळे हस्तगत

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई – अंधेरी पोलिसांनी मोबाईल शॉप फोडून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना मुंब्रा, तुर्भे व डोंगरी परिसरातून शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेली १२३ नामांकित ब्रँडची घड्याळे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. ०७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता ते ०८ सप्टेंबर सकाळी १० वाजेदरम्यान, अंधेरी मेट्रो स्टेशनखालील अरीहंत मोबाईल सेल्स अॅण्ड सर्व्हिसेस या दुकानातील ग्रील व कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांनी १५० घड्याळे, १० मोबाईल व रोख रक्कम असा मौल्यवान माल चोरला. फिर्यादी दिलीप निसर (वय ३५) यांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचत सलग प्रयत्न केले. अखेर चार सराईत आरोपींना अटक करण्यात यश आले. अटक आरोपींपैकी तिघे हे पूर्वीपासूनच अनेक गुन्ह्यांमध्ये वॉंटेड होते.

🔹 अटक आरोपी

१. मोईनुद्दीन नझीम शेख (४६), मुंब्रा
२. साबीर मुस्तफा शेख (४०), वाशी – यापूर्वी २ गुन्हे
३. अमरूद्दीन अलीहसन शेख (६०), डोंगरी, मुंबई – यापूर्वी ५ गुन्हे
४. प्रभु भागल चौधरी (३०), ऐरोली – यापूर्वी ५ गुन्हे

टायटन, फास्ट्रॅक, सोनाटा, डिजायर या नामांकित कंपन्यांची १२३ घड्याळे जप्त करण्यात आली आहेत.

सदर कारवाई पोलीस आयुक्त बृहमुंबई श्री देवेन भारती, सह आयुक्त (का. व सु.) श्री सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग श्री परमजित सिंह दहिया, पोलीस उपायुक्त परिमंडळ १० श्री दत्ता नलावडे, व सहाय्यक पोलीस आयुक्त अंधेरी विभाग श्री गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश मचिंदर व पो.नि. (गुन्हे) श्री विनोद पाटील यांच्या देखरेखीखाली, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पो.उपनि. किशोर परकाळे, पो.उपनि. समाधान सुपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon