शिवाजीनगर पोलिसांची नवरात्रोत्सवपूर्व बैठक; शिस्त, सुरक्षा आणि महिलांच्या सुरक्षिततेवर भर
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : नवरात्रोत्सव २०२५ निमित्त शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या वतीने वडवली येथील गुजराती हॉलमध्ये सार्वजनिक व खाजगी मंडळांसोबत विशेष बैठक घेण्यात आली.
या बैठकीत पोलिसांकडून उत्सव काळात शिस्त व सुरक्षा राखण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. ध्वनीप्रदूषण नियंत्रणाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले गेले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन साधनांची उपलब्धता तसेच वाहतूक नियंत्रण याबाबत सविस्तर सूचना मंडळांना देण्यात आल्या.
या बैठकीस मोठ्या संख्येने मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवाजीनगर पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करून नागरिकांनी उत्सव शांततेत व सुरक्षीत पार पाडण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.