शिवसेना भवनासमोरील धक्कादायक घटना; पोलिसाला ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न

Spread the love

शिवसेना भवनासमोरील धक्कादायक घटना; पोलिसाला ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील शिवसेना भवनासमोर एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रकार समोर आला आहे. सुदैवाने पोलीस कर्मचाऱ्याने वेळीच बाजूला झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्याा माहितीनुसार, शिवसेना भवनासमोर नेहमी गर्दी असते. नेहमी प्रमाणे शिवसेना भवनासमोरील सिग्नलजवळ पोलीस वाहतूक कर्मचारी विश्वास बंडगर हे कर्तव्यावर होते. यावेळी अचानक सिग्नल तोडून एक ट्रक रस्त्याच्या मध्येच येऊन थांबला. वाहतूक पोलीस कर्मचारी बंडगर यांनी ट्रकला अडवलं. बंडगर यांनी ट्रकचालकाला विचारपूस केली.

मुंबईतील टिळक ब्रिजवर ट्रॅफिक असल्यामुळे दुसऱ्या मार्गाने ट्रक घेऊन जाण्यासंदर्भात पोलीस कर्मचारी बंडगर यांनी ट्रकचालकाला सांगितलं होतं. पण मुजोर ट्रक चालकाने मागे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. बंडगर यांनी ट्रकच्या समोर येऊन नंबर प्लेटचा फोटो काढला. पण त्याचवेळी ट्रकचालकाने ट्रक हा ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर घालून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुदैवाने यात वाहतूक पोलीस कर्मचारी विश्वास बंडगर हे बाजूला झाले. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ तर काढला पण, या गंभीर प्रकारानंतर ट्रक चालकाला पुढच्या काही अंतरावर पोलिसांकडून पकडण्यात आलं. याबाबत पोलीस ट्रक चालकाचा तपास करत आहे. त्याने अंगावर गाडी घालण्याचे कृत्य का केलं? याचा तपास पोलीस करीत आहेत. या ट्रकचालकाची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही, पोलीस अधिक तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon