सीसीटीव्हीच्या मदतीने हरवलेली रोकड परत; शांतिनगर पोलिसांची वेगवान कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी : शांतिनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या एका तासात हरवलेली रोकड मालकाकडे सुखरूप परत दिल्याची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका नागरिकाची तब्बल ५० हजार रुपयांची रोकड हरवली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. अवघ्या एका तासात रोकड शोधून काढत ती मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आली.
या तत्पर व कार्यक्षम कारवाईबद्दल शांतिनगर पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. “जनतेचा विश्वास, जनतेची सुरक्षा” ही भावना या कारवाईतून अधोरेखित झाली आहे.