जोगेश्वरीत ५० लाखांची एमटीएनएल केबल चोरी उघड; ८ जण अटकेत, मुख्य आरोपी फरार

Spread the love

जोगेश्वरीत ५० लाखांची एमटीएनएल केबल चोरी उघड; ८ जण अटकेत, मुख्य आरोपी फरार

मुंबई – जोगेश्वरी पश्चिम एस.व्ही. रोडवरील फारूख हायस्कूल समोर तब्बल ५० लाख रुपयांची एमटीएनएल केबल चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ही कारवाई अंबोली पोलिसांनी केली असून ८ जणांना अटक करण्यात आली आहे, तर या टोळीचा मुख्य सूत्रधार ‘भंगारवाला’ आणि त्याचे साथीदार फरार आहेत.

१० सप्टेंबर रोजी पहाटे ३.१५ वाजता ही घटना उघड झाली. पोलीस महानगर दैनिकचे प्रतिनिधी अतीश शिंदे घटनास्थळी पोहोचले असता, सुमारे २५ जणांची टोळी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता उकरून केबल चोरी करताना दिसली. काही जण केबल कापत होते तर काही जण ती ट्रकमध्ये लोड करत होते. शिंदे यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर अंबोली पोलिसांनी धाव घेऊन ८ जणांना ताब्यात घेतले.

कारवाईतून १११० मीटर जेली फील्ड कॉपर केबल, १ जेसीबी, २ ट्रक, १ इनोव्हा कार व १ स्कूटी असा मोठा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अटक आरोपींची नावे :

मिलन सिंह, शुभम गोलीकर, संदीप सोनी, नफीस खान, मनोज पासवान, अब्दुल आहाद, अब्बु हिसाम अब्दुल हलीम आणि रोशन यादव.

सर्व आरोपींवर गुन्हा क्रमांक ०८९९/२०२५ अंतर्गत बीएनएस ३०३(२), ३२४(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना अंधेरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

फरार आरोपींची नावे :

चौधरी चाचा (कुर्ला), रईस खान, शमशाद खान, इसरार खान, समसुद्दीन खान (घाटकोपर पश्चिम), इम्रान मामा (कुर्ला), सतीश नायर (बोरीवली), जुल्फी भाई (बांद्रा पश्चिम), सलका चाचा (पत्ता तपासात).

परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त दिक्षित गेडाम व सहाय्यक पोलीस आयुक्त कल्पना कांदेकऱ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे, एपीआय सुरेश साळवी, पीएसआय सुषांत पाटील आणि अंबोली पोलिसांनी ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon