डोंबिवलीत तरुणाचा गुप्त ‘फायटर क्लब’ उभारण्याचा प्रयत्न; तलाठी कार्यालयाचे कुलूप बदलल्याने गजाआड
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – डोंबिवलीतील विक्रम प्रधान हा मंत्रालयात कंत्राटी शिपाई म्हणून काम करणारा तरुण देशासाठी गुप्त “फायटर क्लब” सुरू करण्याच्या तयारीत होता. तरुणांना गुप्तपणे प्रशिक्षण देऊन देशासाठी उपयोगी करायचे त्याचे स्वप्न होते. या कामासाठी योग्य जागेच्या शोधात त्याने डोंबिवली पश्चिमेतील भावे सभागृहातील तलाठी कार्यालयच निवडले.
शनिवार-रविवारी कार्यालय बंद असताना त्याने कुलूप तोडून नवीन कुलूप बसवले. तक्रारीनंतर विष्णूनगर पोलिसांनी तपास केला असता डिजिटल व्यवहाराच्या आधारे त्याचा शोध लागला. अटक केल्यानंतर चौकशीत त्याने ‘ग्राऊंड फायटर क्लब’ सुरू करण्याची कबुली दिली.
न्यायालयाने त्याला सुरुवातीला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून नंतर आधारवाडी कारागृहात हलवण्यात आले. देशप्रेमाच्या उन्मादातून आणि अतिवाचनाच्या प्रभावाखाली केलेला हा प्रयत्न अखेरीस त्याच्याच अंगलट आला.