कोळीवाड्यातून सायबर गुन्ह्यातील आरोपी अटकेत; फसवणूक रॅकेटचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता

Spread the love

कोळीवाड्यातून सायबर गुन्ह्यातील आरोपी अटकेत; फसवणूक रॅकेटचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – सायबर पोलीस ठाणे, मध्य विभागाच्या पथकाने ट्रॉम्बे कोळीवाड्यात छापा टाकून सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक केली आहे. दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी पोलीस हवालदार खर्जे आणि पोलीस शिपाई गदगे यांनी ट्रॉम्बे कोळीवाडा परिसरात पाळत ठेवली असता, आत्माराम निवास, दर्या दौलत हाऊसजवळ राहणारा शिवकुमार नायडू यास ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची एकूण ३७ लाखांची फसवणूक करण्यात आली असून त्यापैकी ६ लाखांची रक्कम आरोपीच्या करूर वैश्य बैंक मधील खात्यात जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीकडे चौकशी केल्यानंतर हे खाते त्याच्या नावानेच उघडण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले. तसेच हे खाते “श्री महालक्ष्मी इंटरप्राइजेज” या नावाने चालवले जात असल्याची माहिती मिळाली आहे.

याप्रकरणी गु.र.क्र. १३४/२०२५ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलमे ३१८(४), ३१९(२), ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपीच्या नावाने करूर वैश्य बैंक, स्टेट बैंक ऑफ़ इंडिया व कनारा बैंक मध्ये विविध शाखांमध्ये खाते उघडण्यात आल्याचे आढळले आहे. ही खाती देखील सायबर फसवणुकीसाठी वापरली गेल्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon