काल्हेरमध्ये वेश्याव्यवसाय प्रकरण उघडकीस : महिला दलाल अटकेत, १ पीडितेची सुटका

Spread the love

काल्हेरमध्ये वेश्याव्यवसाय प्रकरण उघडकीस : महिला दलाल अटकेत, १ पीडितेची सुटका

पोलीस महानगर नेटवर्क

भिवंडी : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने काल्हेर येथील पुजा व्हेज ॲन्ड नॉनव्हेज हॉटेल (गाळा क्र. ५, जय माता दी कंपाउंड, काल्हेर) येथे सापळा रचून कारवाई करत एका महिला दलालास अटक केली. या कारवाईत तिच्या ताब्यातील एका असहाय्य मुलीची सुटका करण्यात आली.

ही कारवाई ०४ सप्टेंबर रोजी करण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला असहाय्य मुलींना फूस लावून वेश्याव्यवसायासाठी आणत असल्याची खात्री पटताच पथकाने धाड टाकली. सदर आरोपीविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ११०६०/२०२५ भा.दं.सं. कलम १४३(१) सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव व सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध) रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनिरी. वैशाली गोरडे, मपोउपनि. स्नेहल शिंदे, पो.हवा. सुवारे, पो.हवा. पाटील, मपो.हवा. भगत, मपो.अंम. खरात व चापो.अंम. निकम यांनी केली. महत्वाचे म्हणजे, अटक झालेल्या महिला दलालावर यापूर्वीही मिरारोड पोलीस ठाण्यात अशाच स्वरुपाचा गुन्हा दाखल असल्याचे समजते. प्रस्तुत गुन्ह्यात पोलिसांनी जलदगतीने दिलेला प्रतिसाद व पीडित मुलीची सुटका ही कारवाई उल्लेखनीय ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon