डोंबिवली पूर्वेत पोलीसांचा रूट मार्च : गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण सुरळीत पार पाडण्यासाठी पावले उचलली

Spread the love

डोंबिवली पूर्वेत पोलीसांचा रूट मार्च : गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण सुरळीत पार पाडण्यासाठी पावले उचलली

पोलीस महानगर नेटवर्क 

डोंबिवली – टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत (दि. ०२ सप्टेंबर २०२५) रोजी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.

हा रूट मार्च सकाळी ११:३० वाजता विकासनाका, नवी गोविंदवाडी, कचोरे, कल्याण (पूर्व) येथून सुरू झाला. त्यानंतर बीएसयुपी बिल्डींग, जय भारत नगर, दारूल उलूम रेहमानिया मदरसा, जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारा रस्ता, गवळी देव मंदिर, जुबेदा मदरसा, गावदेवी चौक, पत्रिपूल, मोहनसृष्टी, हनुमान नगर, कचोरे पोलीस चौकी मार्गे परत गावदेवी चौक येथे दुपारी १२:३० वाजता समाप्त झाला.

या रूट मार्चमध्ये मा. पोलीस उप आयुक्त श्री. अतुल झेंडे (परिमंडळ ३), मा. श्री. सुहास हेमाडे (सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग), तसेच ३ वपोनी, २४ पोलीस अधिकारी, ९३ अंमलदार, ७ होमगार्ड, ०३ पिटर मोबाईल, एसआरपीएफ ग्रुप ५ चे १ अधिकारी व ११ अंमलदार, तसेच ०४ सीआरएम मोबाईल सहभागी झाले होते.

रूट मार्चदरम्यान नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असून आगामी सण सुरळीत व शांततेत पार पडावा, हा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon