रायगड जिल्ह्यात तरुणाकडून अल्पवयीन मुलीला बदनामीची धमकी देत वारंवार अत्याचार; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड : महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती वरदा सुनील तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत त्यांना गर्भवती करण्याचे प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वी एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलींला घरी आणून अल्पवयीन आरोपी मुलाने वारंवार अत्याचार केले असल्याची घटना ताजी असताना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात अलिबाग तालुक्यातील तालुक्यातील बावीस वर्षीय आरोपीने अलिबाग तालुक्यातील अल्प वयीन मुलींवर अत्याचार करीत तिला चार महिन्याची गर्भवती ठेवले असल्याची घटना समोर आली आहे. पेण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणारे पेण तालुक्यात मार्च २०२४ते एप्रिल २०२५ दरम्यान पेण तालुक्यातील बावीस वर्षीय तरुणाने अलिबाग तालुक्यातील अल्प वयीन पीडिता सोळा वर्षीय मुलीला तिची बदनामी करण्याची धमकी देत तिला मारहाण देखील केली होती. आपली बदनामी होऊ नये म्हणून पीडिता घाबरली. आणि याचा फायदा घेत पेण तालुक्यातील बावीस वर्षीय आरोपीने पीडिता पेण तालुक्यातील घरी बोलावून घेत तिच्या मनाविरुद्ध वारंवार अती प्रसंग करीत जबरदस्ती करीत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे सोळा वर्षीय अल्प वयीन पीडिता गर्भवती झाली. याबाबत फिर्याद अल्पवयीन पीडितेने २८ऑगस्ट २०२५ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्याद दाखल केली असल्याची माहिती पेण पोलिसांकडून रविवारी प्राप्त झाली आहे.
याबाबत पेण पोलीस ठाण्यात गु.रजि.नं.१६१/२०२५ भा. न्याय. संहिता कलम ६४ (२) (आय) (एम), ११५,३५१(२) बालकांचे अपराधापासुन अधिनियम २०१२ चेकलम ४,६,८ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उप निरीक्षक शिल्पा वेगुर्लेकर या करीत आहेत.या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली असून पेण न्यायालयाने ६ सप्टेंबर २०२५ पोलिस कोठडी सुनावली आहे.