डिजे मुक्तीसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता महिलेची ७ व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
उल्हासनगर – उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी यांनी त्यांच्या राहत्या घरी सातव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली आहे. सरिता खानचंदानी यांनी सामाजिक कार्य करत महाराष्ट्रातील डीजे हे वाद्य बंद करण्यामध्ये मोठी भूमिका बजावली होती. अज्ञात कारणावरुन त्यांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली आहे. उडी मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. नेमकी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून नातेवाईकांचा जबाब नोंदवून पुढील कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सरिता खानचंदानी यांचा उडी मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर परिशरात हळहळ व्यक्त केली जात आहे.