पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात महत्वाची अपडेट; पुराव्यांची छेडछाड केल्याचा रोहिणी खडसेंवर आरोप

Spread the love

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात महत्वाची अपडेट; पुराव्यांची छेडछाड केल्याचा रोहिणी खडसेंवर आरोप

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याला पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडले. यानंतर सातत्याने गंभीर आरोप करण्यात आली. पती प्रांजल खेवलकर याला चुकीच्या प्रकरणात अडकवले गेले आणि यामागे मोठे षडयंत्र असल्याचे रोहिणी खडसे यांनी म्हटले. फक्त हेच नाही तर पतीला वाचवण्यासाठी त्या थेट कोर्टात देखील पोहोचल्या. मात्र, खेवलकरला दिलासा मिळतच नसल्याचे स्पष्ट दिसतंय. आता पतीला वाचवण्यामध्ये रोहिणी खडसे यांच्याच समस्येत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. रोहिणी खडसे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आली. रोहिणी खडसे यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये. हेच नाही तर रोहिणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात महत्वाची अपडेट आली आहे. पुराव्यांची छेडछाड केल्याचा रोहिणी खडसेंवर आरोप आहे. पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे यांनी पुराव्याची छेडछाड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. फक्त आरोपच नाही तर गुन्हा ही दाखल होऊ शकतो.

रोहिणी खडसे या मागील काही दिवसांपासून पतीला वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. त्यांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट देखील घेतली. हेच नाही तर कोठडीमध्ये जाऊन त्यांनी पतीसोबत संवाद देखील साधला. मधल्या काळात रोहिणी खडसे यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली आणि रेव्ह पार्टी प्रकरणातील संपूर्ण माहिती ही त्यांना दिली. कशाप्रकारे पतीला फसवण्यात आले हे सांगताना रोहिणी खडसे दिसल्या. रोहिणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. रोहिणी खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच या प्रकरणी बोलताना म्हटले होते की, योग्य वेळी मी सर्वांना उत्तर देणार आहे. सध्या पतीसाठी रोहिणी खडसे या जळगाव नाही तर पुण्यात तळ ठोकून आहेत. यादरम्यानच्या काळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट गंभीर आरोप खेवलकर यांच्यावर केली होती. यासोबतच त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon