दुचाकीस्वाराच्या सतर्कतेने बाळकुम येथे हरवलेला चार वर्षांचा मुलगा सुखरूप आईच्या ताब्यात
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – बाळकुम परिसरात हरवलेला अवघ्या चार वर्षांचा मुलगा एका सतर्क दुचाकीस्वारामुळे सुखरूप सापडला. दुचाकी चालकाने रस्त्यावर एकटा भटकताना मुलाला पाहिले. परिस्थिती संशयास्पद वाटल्याने त्याने तत्काळ मानवतेचे भान ठेवून मुलाला कापुरबावडी पोलीस ठाण्यात आणले.
कापुरबावडी पोलिसांनी मुलाशी संवाद साधून माहिती मिळवली व तत्परतेने शोधमोहीम राबवली. काही वेळातच मुलाच्या आईचा शोध लागला. मुलगा सुखरूप मिळाल्याने आईच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. परिसरातील नागरिकांनीही दुचाकीस्वाराचे व पोलिसांचे कौतुक केले.
पोलिसांनी आवाहन केले आहे की, “कोणीही बालक वा व्यक्ती बेवारस अथवा हरवलेल्या स्थितीत आढळल्यास नागरिकांनी विलंब न लावता 📞 ११२ आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा. अशा तत्परतेने व नागरिकांच्या सहकार्यानेच समाज सुरक्षित राहील.”