कुराश राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई उपनगरच्या खेळाडूंची चमक; रौप्य व कांस्य पदकांची कमाई
रवि निषाद /मुंबई
कोल्हापूर: कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित सब ज्युनियर गट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ ही स्पर्धा १६ आणि १७ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे पार पडली. या स्पर्धेत कुराश असोसिएशन ऑफ मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत रौप्य आणि कांस्य पदके पटकावली.
पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे –
वीरा रातडा (एस.वी.डी.डी.) – रौप्य
रिषभ चौरसिया (एस.वी.डी.डी.) – रौप्य
अक्षिता प्रजापती (आर.ए.वी. इंग्रजी) – कांस्य
कीर्ती पटेल (आर.ए.वी. इंग्रजी) – कांस्य
सिमर यादव (एस.पी.आर.जे. गुजराती) – कांस्य
आध्या सागवेकर (एस.पी.आर.जे. इंग्रजी) – कांस्य
खेळाडूंनी कुराश असोसिएशन ऑफ मुंबई उपनगर या संघातून स्पर्धेत सहभाग घेत उल्लेखनीय यश मिळवले.
या यशाबद्दल मुंबई विभागप्रमुख आकाश जाधव, जिल्हाध्यक्ष निलेश मस्करे, उपाध्यक्ष दिलीप श्रीहरी गोपालघरे, सेक्रेटरी प्रितेश ज्योती संदीप चांदणे, पंच कल्याणी देशमुख, तसेच प्रशिक्षक शिवम पिंगळे, निशांत जाधव, संदेश मरगजे, यश चांदणे, रोहीत काकडे यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष अंकुश नागर आणि महासचिव शिवाजी साळुंखे यांनी सर्व पदक विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा देत, आगामी राष्ट्रीय स्पर्धा (छत्तीसगड रायपूर) साठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या. मुंबई उपनगरच्या या यशस्वी खेळाडूंनी कुराश क्रीडेत भविष्यात मोठे यश संपादन करण्याची आशा व्यक्त केली जात आहे.