कोळसेवाडीतील सराईत गुन्हेगार अरबाज हबीब शेखवर एमपीडीए अंतर्गत कारवाई; एक वर्षासाठी स्थानबद्ध

Spread the love

कोळसेवाडीतील सराईत गुन्हेगार अरबाज हबीब शेखवर एमपीडीए अंतर्गत कारवाई; एक वर्षासाठी स्थानबद्ध

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार अरबाज हबीब शेख (वय २३, रा. खडेगोलवली, अवधराम नगर, साईबाबा मंदिर समोर, कल्याण पूर्व, जि. ठाणे) याच्यावर अखेर एमपीडीए (महाराष्ट्राचा झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्हिडिओ पायरेटस्, वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारी व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणेबाबतचा अधिनियम १९८१ व त्यातील सुधारणा १९९६, २००९ व २०१५) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील रेकाॅर्डवरील गुन्हेगार असलेल्या शेखविरुद्ध सतत वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे पोलीसांनी मा. पोलीस आयुक्त, ठाणे यांच्याकडे अहवाल सादर केला होता. त्यानुसार मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी आपल्या कार्यालयीन आदेश क्रमांक/टीसी/पीडी/एमपीडीए/१३/२०२५ दिनांक २२/०८/२०२५ अन्वये त्यास एक वर्ष कालावधीसाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश जारी केला.

सदर आदेशाची अंमलबजावणी करताना अरबाज हबीब शेख यास 23 ऑगस्ट 2025 रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले. आदेशाची बजावणी करून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर एक अधिकारी व तीन अमलदारांच्या ताब्यात त्यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले. रात्री २३.४२ वाजता शेख यास नाशिक कारागृहात जमा करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोळसेवाडी पोलीसांच्या या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon