दरोड्याच्या तयारीत असलेले ७ सराईत गुन्हेगार मिरारोडमध्ये अटकेत; दोन देशी पिस्तुले, ८ जिवंत काडतुसे जप्त

Spread the love

दरोड्याच्या तयारीत असलेले ७ सराईत गुन्हेगार मिरारोडमध्ये अटकेत; दोन देशी पिस्तुले, ८ जिवंत काडतुसे जप्त

मिरारोड – खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा (ठाणे शहर) यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मिरारोड परिसरातील पेणकरपाडा, सनशाईन हॉटेलजवळ काही सराईत गुन्हेगार दरोड्याच्या तयारीसाठी जमले असल्याची माहिती मिळाली होती. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी सापळा रचून सात गुन्हेगारांना रंगेहात अटक केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २ देशी बनावटीची पिस्तुले, ८ जिवंत काडतुसे, २ फाईटर पंच, २ सुती दोर, ८ मोबाईल फोन आणि २ चारचाकी वाहने असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर आरोपींविरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ३४१/२०२५ अन्वये भा.दं.सं. कलम ३१०(४)(५), तसेच आर्म्स अ‍ॅक्टच्या कलम ३, २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ८ ऑगस्ट २०२५ पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अटक आरोपींची नावे:

१. रोहित खेमजीभाई वनकार ऊर्फ परमार (२३, कच्छ, गुजरात)

२. प्रतिक भोईर (२६, वसई)

३. निरज वेखंडे (२६, वाडा)

४. समीर पालवी (२९, भिवंडी)

५. भावेश गवाळे (२४, वाडा)

६. अमर शिर्के (३०, वाडा)

७. विजय वारघडे (३०, वाडा)

हे सर्व आरोपी अत्यंत सराईत असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांत दंगल, चोरी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, तसेच आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त श्री. दत्तात्रय शिंदे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोनि. राहुल राख, सपोनि. विलास कुटे, विजयेंद्र आंबवडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon