कल्याणमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळ झा ची, पत्रकारांना धमकी

Spread the love

कल्याणमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळ झा ची, पत्रकारांना धमकी

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण – कल्याणमध्ये एका गुंड प्रवृत्तीच्या तरुणाने रुग्णालयात रिसेप्शनिस्ट असणाऱ्या मराठी तरुणीला मारहाण केल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांचा मदतीने गोकुळचा शोध घेत त्याला अटक केली. त्यानंतर कोर्टाने गोकुळला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.शुक्रवारी त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. मात्र पोलीस कोठडीतून कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याने पत्रकारांना धमकी दिली. “परत तुम्हाला भेटतो,” असं तो पत्रकारांना म्हणाला आणि त्याने पोलिसांशी देखील अरेरावी केली. गोकुळ झा याने कल्याणमधील नांदिवली परिसरातील एका क्लिनिकमध्ये तरुणीला मारहाण केली होती. या प्रकरणी तो फरार होता. नागरिक आणि मनसे कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी त्याला अटक केली. तो एका गुन्ह्यात शिक्षा भोगून नुकताच तुरुंगातून बाहेर आला होता. पोलिसांनी गोकुळ झा याच्या भाऊ रणजितला देखील ताब्यात घेतले आहे. गोकुळ झा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अशातच कल्याण प्रकरणात आपल्याविरुद्ध झालेल्या वार्तांकनामुळे चिडलेल्या गोकुळने शुक्रवारी कोर्टात हजर होण्यापूर्वी पत्रकारांना धमकी दिली. याबाबतचा व्हिडिओ समोर आला आहे.

तुम्ही सगळं चुकीचं छापलं आहे. तुम्ही हे चुकीचं केलंय. आपली लवकरच भेट होईल,” असं म्हणत गोकुळ झा याने शुक्रवारी पोलिसांसमोर पत्रकारांना धमकी दिली. तसंच पोलिसांशीही हुज्जत घातली. त्यामुळे तरुणीला मारहाण करणाऱ्या या आरोपीची मस्ती अजूनही कायम असल्याचंच दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon