मुंबईत दारूच्या नशेत तरुण-तरुणींचा धिंगाणा; पोलीसांकडून शोध सुरु
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईच्या मालाड लिंक रोडवर मध्यरात्री एका कारमध्ये तरुण आणि तरुणींनी धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.तरुण आणि तरुणींनी कारच्या सन रुफमधून बाहेर येत मालाड लिंक रोड मीठ चौकीजवळ रस्त्यावर धिंगाणा घातला. भरधाव वेगामध्ये कार चालवून स्वतःचा जीव आणि इतरांच्या जीव धोक्यात घालून तरुणांचा धिंगाणा सुरु होता.हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
या प्रकरणी कांदिवली वाहतूक पोलिसांच्या फिर्यादीवरून या तरुणांच्या विरोधात बांगुर नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल केल्यानंतर बांगुर नगर पोलीस धिंगाणा करणाऱ्या या तरुणांचे शोध घेत आहेत.या धिंगाणा करणाऱ्या तरुण आणि तरुणींची व्हिडिओ बनवणाऱ्या कार चालकांनी हे दारूचे नशेत धिंगाणा करत असल्याचा आरोप केला आहे.