मुंब्र्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; महिला दलाल अटकेत, ३ पीडित मुलींची सुटका, ठाणे क्राईम ब्रँचची कारवाई

Spread the love

मुंब्र्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; महिला दलाल अटकेत, ३ पीडित मुलींची सुटका, ठाणे क्राईम ब्रँचची कारवाई

मुंब्रा – ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने मोठी कारवाई करत देहव्यापारासाठी मुली पुरवणाऱ्या एका महिला दलालाला अटक केली असून, तिच्या ताब्यातून ३ पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे मॅडम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ एक महिला दलाल ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून त्यांना देहव्यवसायासाठी पुरवते, अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती.

त्याआधारे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक ठाणे शहराच्या पथकाने बनावट ग्राहक आणि पंचाच्या मदतीने सापळा रचत मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ छापा टाकला. या कारवाईत संबंधित महिला एजंटला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान तिच्याकडून देहव्यवसायात जबरदस्तीने ढकललेल्या ३ पीडित मुलींची सुटका करण्यात आली. सदर महिला दलाल गेल्या २ वर्षांपासून अशा प्रकारे ग्राहकांना फोटो पाठवून मुली पुरवण्याचा अवैध धंदा करत होती. सद्यस्थितीत क्राईम ब्रँच पथक या दलालाचे आणखी किती साथीदार आहेत, व किती पीडित मुलींना या जाळ्यात अडकवले गेले आहे, याचा तपास करत आहे.

सदर आरोपीवर पिटा कायदा आणि भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तसेच सुटका करण्यात आलेल्या ३ पीडित मुलींना सुरक्षित महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक, ठाणे शहरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे मॅडम, पोलीस उपनिरीक्षक निलेश क्षीरसागर सर, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे मॅडम, सहाय्यक उपनिरीक्षक वालघुडे सर आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक ठाणे शहर पथकाने संयुक्तपणे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon