दोन अल्पवयीन मुलांवर लिपस्टिक आणि जेल लावून अनैसगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कल्याण रेल्वे स्थानकातून अटक
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – दोन अल्पवयीन मुलांवर अनैसगिक अत्याचार करणाऱ्या विकृताला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा नराधम विकृत पीडित अल्पवयीन मुलांना लिपस्टिक आणि जेल लावून अनैसगिक अत्याचार करीत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे अरुण उत्तप्पा (२८) असे या विकृत अटक आरोपीचे नाव आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित दोन्ही अल्पवयीन मुले वडाळा येथे राहणारे आहेत तर, नराधम अरुण हाही याच परिसरात राहत असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत त्यातच रविवारी संध्याकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात फलाटावर फिरत असलेल्या तीन संशयितांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली. दोन्ही पीडित लहान मुले ११ वर्षाची असून पोलीस चौकशीत नराधम अरुण याने पीडित दोन अल्पवयीन मुलांना फिरण्याच्या बहाण्याने कल्याण रेल्वे स्थानकात परिसरात आणले होते. मात्र कल्याण रेल्वे स्टेशनवर या तिघांना पाहून गस्तीवर असणाऱ्या रेल्वे पोलिसांच्या पथकाला संशय आला.
त्यांनी नराधम अरुणसह या दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं त्यांची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, या मुलांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलांना लिपस्टिक लावून तसेच जेलचा वापर करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. कल्याण स्थानकातून पुढे जाण्याच्या तयारीत असलेल्या या तिघांवर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. चौकशी केल्यानंतर या चिमुकल्यांची नराधमाच्या तावडीतून सुटका झाली आहे. या संदर्भात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांच्याशी संपर्क साधला असता आरोपी हा अनेक महिन्यांपासून पीडित अल्पवीयन मुलांवर लैंगिक अत्याचार करत होता. पीडित मुलं आणि आरोपी हे तिघेही मुंबईतील वडाळा परिसरात राहत असल्याने कल्याण रेल्वे पोलिसांनी हा गुन्हा वडाळा पोलिसांकडे वर्ग केला आहे. तसेच नराधमाकडून लिपस्टिक आणि जेल जप्त केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.