वरळी डोममध्ये केलेल्या मारहाणीच्या वक्तव्यावरुन राज ठाकरे यांच्या विरोधात डीजीपींकडे तक्रार दाखल

Spread the love

वरळी डोममध्ये केलेल्या मारहाणीच्या वक्तव्यावरुन राज ठाकरे यांच्या विरोधात डीजीपींकडे तक्रार दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – त्रिभाषा धोरणावरून राज्यात बराच गदारोळ झाला होता. पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोध झाला होता. त्रिभाषा सूत्रीत हिंदी भाषाच्या सक्तीचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन विजयी मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन डीजीपींकेड तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी वरळी डोम येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात भाषण केले. दरम्यान त्यांनी, मारहाण करतानाचा व्हिडीओ काढू नका असे म्हटले होते. या वक्तव्यावर अक्षेप घेत महाराष्ट्र डीजीपींकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काल एका व्यापाऱ्याच्या कानफडात मारली. त्याच्या माथ्यावर लिहिलं होतं का गुजराती. इतर हिंदी आणि वेगळ्या चॅनलमध्ये गुजराती माणसाला मारलं. बाचाबाचीत समोरचा गुजराती निघाला. गुजरात्याला मारलं का. किती व्यापारी आहे. अजून तर काही केलं नाही. त्यांना मराठी आली पाहिजे. यात वाद नाही, ऊठसूट मारायची गरज नाही. पण जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढला पाहिजे’ असे राज ठाकरे म्हणाले होते. पुढे ते म्हणाले होते की, ‘पण चूक त्यांची असली पाहिजे. अशी कधी गोष्ट कराल तर त्याचे व्हिडीओ काढू नका. आपल्या आपल्यातच त्यांना कळलं पाहिजे. कळलं का? मारणारा कधी सांगणारा नसतो. मार खाणारा सांगतो. मला मारलं. त्यांना सांगू देत. पण ऊठसूट कुणाला मारू नका. अनेक लोक आहेत. माझ्या परिचयाचे आहे. माझा मित्र आहे, नयन शाह. मी त्याला गुजराठी म्हणतो. तो अप्रितम मराठी बोलतो. पण विनोदाचं अंग आहे. शिवाजी पार्कात हेडफोन लावून पुलं देशपांडे ऐकणारा गुजराती आहे. मराठीचं हे बाळकडू आमच्यासाठी बाळकडूच होतं.’ पण आता त्यांच्या या वक्तव्याविरोधात डीजीपींकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon