‘देवों के देव… महादेव’ फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जी व पतीवर अपहरण, खंडणीचे गंभीर आरोप; गुन्हा दाखल, अटकेची शक्यता

Spread the love

‘देवों के देव… महादेव’ फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जी व पतीवर अपहरण, खंडणीचे गंभीर आरोप; गुन्हा दाखल, अटकेची शक्यता

पोलीस महानगर नेटवर्क

गोवा : ‘देवों के देव… महादेव’ या लोकप्रिय मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि तिचा पती कुणाल वर्मा यांच्यावर गंभीर आरोप लागले आहेत. बंगाली चित्रपट निर्माते श्याम सुंदर डे यांनी पूजा आणि कुणालवर गोव्यात अपहरण व खंडणी घेतल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. श्याम यांची पत्नी मालविका डे यांनी ३१ मे ते ४ जून या कालावधीत घडलेल्या घटनेविषयी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, गोव्यातील कलंगुट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्या मते, श्याम सुंदर यांना गोव्यात कारमधून प्रवास करत असताना अडवून एका व्हिलामध्ये बळजबरीने नेण्यात आले आणि २३ लाख रुपये खंडणी म्हणून वसूल करण्यात आले.

तक्रारीनुसार, श्याम यांना जबरदस्तीने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले, त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणात पूजा आणि कुणालवर भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम १२६(२), १३७(२), १४०(२), ३०८(५), ११५(२), ३५१(३) व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची झिरो एफआयआर कोलकातामधून गोवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती. २ जुलै रोजी कलंगुट पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याआधी पूजा आणि कुणाल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून त्यांच्यावर मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती दिली होती. त्यांनी आपली आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोसळल्याचे सांगत, पुन्हा शून्यातून सुरुवात करत असल्याचेही नमूद केले होते. या प्रकरणाच्या चौकशीनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon