मेट्रोचा दरवाजा बंद झाल्याने चिमुकला अडकला, कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

Spread the love

मेट्रोचा दरवाजा बंद झाल्याने चिमुकला अडकला, कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबई मेट्रोच्या यलो लाईन २ ए वर एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. ट्रेनमध्ये प्रवेश करताना मेट्रोचा दरवाजा बंद झाला अन् चिमुकला मुलगा बाहेरच अडकल्याचा धक्कादायक प्रकार बांगूरनगर मेट्रो स्थानकात घडला. सुदैवाने तिथेच ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी २९ जून रोजी बांगुर नगर स्टेशनवर हा सगळा प्रकार घडला. सकाळच्या सुमारास मेट्रोमध्ये चढताना अचानक दरवाजा बंद होत असताना एक चिमुकला मुलगा अचानक बाहेर येतो आणि मेट्रोचे दरवाजे बंद होतात. दरवाजे बंद होताच मुलगा बाहेर उभा राहून पुन्हा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो. हा सगळा प्रकार प्लॅटफॉर्मवर तैनात असलेले स्टेशन अटेंडंट संकेत चोडणकर लक्षात आला.

ज्यानंतर त्यांनी तातडीने धाव घेत ट्रेन ऑपरेटरला गाडी थांबवण्याची सूचना केली. गाडी थांबताच संकेत चोडणकर यांनी मुलाकडे धाव घेतली आणि ट्रेनचे दरवाजे पुन्हा उघडताच त्याला त्याच्या पालकांकडे सुपूर्द केले. हा सगळा प्रकार स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. संकेत चोडणकरच्या सतर्कतेमुळे आणि चाणाक्षतेमुळे मोठी दुर्घटना घडली. त्यांच्या या चलाखीचे कौतुक होत आहे. सतर्कता आणि जलद प्रतिसादामुळे जीव वाचला! बांगूर नगर मेट्रो स्टेशनवर दरवाजे बंद होत असताना २ वर्षांचा मुलगा एकटाच ट्रेनमधून बाहेर पडेला. परंतु आमचे स्टेशन अटेंडंट संकेत चोडणकर यांच्या तीक्ष्ण नजरेमुळे संभाव्य दुर्घटना टळली. संकेतने त्वरीत ट्रेन ऑपरेटरला दरवाजे पुन्हा उघडण्यासाठी सूचना दिली आणि काही सेकंदातच मुलाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी धाव घेतली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारची उपस्थिती आणि समर्पणामुळे आमचा महा मुंबई मेट्रोचा प्रवास दररोज सुरक्षित होतो धन्यवाद, संकेत! आमचा महा मुंबई मेट्रो कर्मचारी प्रवाशांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षित आहे जेणेकरून तुमचा आमच्यासोबत दररोज सुरक्षित आणि आरामदायी प्रवास होईल, असं मेट्रो प्रशासनाने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon