मुंबई हादरली ! आईच्या प्रियकराने १० वर्षीय चिमुकलीवर केले अत्याचार; गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकत नराधमाने बनवला व्हिडिओ
मुंबई – मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेत मेघवाडी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने प्रेयसीच्या १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मुलीच्या गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर टाकला. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून नराधमाने व्हिडिओ शूट केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. या घटनेने मुंबई एकदा पुन्हा हादरलीय. या घटनेनंतर २४ वर्षीय तरुणासह त्याच्या प्रेयसीला मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. राज्यभरात महिला अत्याचार, लैंगिक छळाच्या धक्कादायक घटना समोर येत असताना मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व भागात अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची भयंकर घटना घडलीय. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून २४ वर्षीय तरुणासह त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण मुंबई पुन्हा हादरलीय. प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करत क्रूरतेची हद्द नराधमाने पार केली. ही चिमुकली अवघ्या १० वर्षांची आहे.
जोगेश्वरी पूर्व भागातील मेघवाडी परिसरात आपली २१ वर्षीय प्रेयसी कामावर गेल्यावर तिच्या १० वर्षांच्या मुलीवर २४ वर्षीय तरुणाने वारंवार अत्याचार केला. अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर टाकत या संपूर्ण कृत्याचा व्हिडीओ नराधमाने शुट केला. त्यानंतर पुन्हा मुलीवर चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. हा प्रकर मुलीच्या आईला कळल्यानंतर आरोपी प्रियकराने महिलेवरही टोकदार वस्तूने हल्ला केला. जर कोणाला या प्रकाराची माहिती दिली तर काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी नराधमानं दिली. या घटनेनंतर हिंमत करत महिलेने मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मेघवाडी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत २४ वर्षीय तरुणाला आणि त्याच्या प्रेयसीला म्हणजेच पीडित अल्पवयीन मुलीच्या आईलाही अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास मेघवाडी पोलीस करत आहेत.