ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

Spread the love

ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

महिलेला प्रसुतीकळा सुरु झाल्या पण डॉक्टर दारुच्या नशेत झिंगाट

योगेश पांडे / वार्ताहर

नाशिक – राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांचे हाल अन् गैरसोय झाल्याचे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तनिषा भिसे या गरोदर महिलेचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. अशातच आता नाशिकमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील नांदगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेला डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत असल्याने ताटकळत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे प्रसुतीसाठी आलेल्या रुग्णाला मनस्ताप सहन करावा लागलाच मात्र उपचारात विलंब झाल्याने एखादी दुर्घटनाही घडण्याची शक्यता होती. डॉक्टरांच्या या निष्काळजीपणामुळे नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

हा सर्व संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर शिवसैनिकांनी रुग्णालयात धाव घेत जाब विचारला. या प्रकाराने संताप अनावर झालेल्या शिवसैनिकांनी संबंधित डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना चांगलाच चोप दिला. धक्कादायक बाब म्हणजे शिवसैनिकांनी जाब विचारल्यानंतर सिझेरियन करावं लागेल असं सांगण्यात आलेले मात्र प्रत्यक्षात प्रसुती साधारण झाली. या घडलेल्या प्रकारानंतर मद्यधुंद असलेल्या डॉक्टर, कर्मचारी यांचे निलंबन करण्याचे संकेतही सिव्हिल सर्जन शिंदे यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon