अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीस १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, तर आरोपीच्या आईची निर्दोष मुक्तता 

Spread the love

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीस १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, तर आरोपीच्या आईची निर्दोष मुक्तता 

पोलीस महानगर नेटवर्क 

ठाणे – ठाण्यात पाचपाखाडी परिसरात राहणाऱ्या आरोपीने अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. सदर घटना फेब्रुवारी २०१७ चे दरम्यान रायगड गल्ली, पाचपाखाडी, ठाणे येथे घडली. यातील आरोपी आकाश मारूती हटकर वय २८ वर्षे याने अल्पवयीन मुलगी हिला जिवे ठार मारण्याची धमकी देवुन तीच्या सोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवून घडलेला प्रकार कोणास सांगितल्यास कुंटुंबीयांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तीस जबरदस्तीने गर्भपात करण्यास आरोपी व त्याची आई रेखा मारूती हटकर वय ४८ वर्षे हे उल्हासनगर येथे डॉक्टरकडे घेवुन जावून फिर्यादीस जबरदस्तीने गर्भपात कर नाहीतर तुझी बदनामी करू अशी धमकी देवून गर्भपात करण्यास भाग पाडले. सदर घडलेल्या प्रकाराबाबत अल्पवयीन मुलीने नौपाडा, पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १५५/२०१७, भारतीय दंड संहिता कायदा कलम ३७६ (एफ) (एच) (आय) (एन) ५०६ (२), सह पोस्को ३,४,५,६ नुसार आरोपी १. आकाश मारूती हटकर वय २८ वर्षे व रेखा मारूती हटकर वय ४७ वर्षे यांच्या विरूध्द फिर्याद दिली होती व त्या गुन्हयात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. सदर गुन्हयाच्या तपासात तत्कालीन तपास अधिकारी प्रकाश पाटील, पोलीस निरीक्षक व त्यांया तपास पथकाने भक्कम पुरावे गोळा करून आरोपी विरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

सदर गुन्हयाची सुनावणी माननीय देशमुख, जिल्हा सत्र न्यायाधीश, ठाणे यांनी घेवुन बलात्काराच्या गुन्हयातील आरोपी आकाश मारूती हटकर यास फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २३५ (२) अन्वये दोषी ठरवून त्यास भारतीय दंड संहिता ३७६ प्रमाणे १० वर्ष सश्रम कारावास व ५० हजार रूपये दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्ष साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच दुसरी आरोपी रेखा मारूती हटकर हीस फौजदारी प्रक्रिया संहिता २३५ (१) अन्वये या गुन्हयातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

सदर बलात्काराच्या गुन्हयाच्या संदर्भात सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्त्या श्रीमती रेखा हिवराळे, म्हात्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे), शरद कुंभार, तत्कालीन तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस उप निरीक्षक प्रशांत लोंढे, मुद्देमाल कारकुन सपोउपनि बोराडे, कोर्ट पैरवी पोहवा राठोड, लोहार, समन्स व वॉरंन्ट अंमलदार पोहवा म्हामुनकर, वीर, पोशि सिंग, यांनी अथक परिश्रम करून न्यायालयात ठोस पुरावे सादर केले व त्यामुळे सदर गुन्हयातील आरोपीला दोषी ठरविण्यात यश आल्यामुळे सदर उत्कृष्ठ कामगिरीबाबत पोलीस दलात व समाजातील सर्व स्तरातुन पोलीसांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon