नागपाडा पोलिसांची जबरदस्त कामगिरी: १२ तासांत ३ कोटींचे सोने हस्तगत, ५ आरोपी अटकेत

Spread the love

नागपाडा पोलिसांची जबरदस्त कामगिरी: १२ तासांत ३ कोटींचे सोने हस्तगत, ५ आरोपी अटकेत

मुंबई – नागपाडा परिसरात घडलेल्या भरदिवसा सोनं लुटप्रकरणाचा अवघ्या १२ तासांत छडा लावून, तब्बल ₹२.५५ कोटींच्या ३००० ग्रॅम सोन्याची बॅग हस्तगत करत नागपाडा पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणी एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिसांची ही वेगवान कारवाई कौतुकास्पद ठरतेय. १२ जून २०२५ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास, लोअर परळकडे जाणाऱ्या रस्त्यावर चार अनोळखी इसमांनी एका व्यापाऱ्याला आणि त्यांच्या पुतण्याला मारहाण करून त्यांच्या जवळील सोन्याने भरलेली बॅग हिसकावून नेली होती. बॅगेत सुमारे ₹२.५५ कोटींचे, ३००० ग्रॅम वजनाचे सोने होते. सदर गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन नागपाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपायुक्त (प्रकटीकरण) आणि परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके तातडीने सक्रिय झाली.पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गुन्ह्यातील पाचही आरोपींना अटक केली असून, सर्व मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

या उल्लेखनीय कारवाईमुळे मुंबई पोलीस दलाच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. ही कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, सह पोलीस आयुक्त (कार्यक्रम व सुरक्षा) सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) विक्रम देशमाने, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-३) श्री. कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या वेगवान आणि अचूक कारवाईबद्दल नागपाडा पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon