चाकणमध्ये खोलीत डांबून ३० वर्षीय महिलेवर अनेक वेळा बलात्कार, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – राज्यात महिला व मुलींवर दिवसेंदिवस अत्याचार, बलात्कार वाढत आहेत. अशीच एक घटना घडली आहे. पुण्यातील चाकण परिसरात एका ३० वर्षीय महिलेला चाकूचा धाक दाखवून घरात डांबून ठेवून बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी गणेश नाणेकर याच्यासह पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ओम नाणेकर आणि रणजित येरकर हे अन्य दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पीडितेने जबाबात सांगितले की, ५ जून रोजी आरोपींनी चाकूचा धाक दाखवून महिलेला गोसावीच्या राहत्या घरी नेले, जिथे मुख्य आरोपीने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला, मारहाणही केली. दरम्यान, महिलेने ११२ क्रमांकावर फोन केला व तिची सुटका करून घेतली.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. आरोपींवर अपहरण, बलात्कार आणि आयपीसीच्या इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली आहे. पीडितेने तीन वर्षांपूर्वी मुख्य आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती, पुराव्याअभावी प्रकरण बंद करण्यात आले होते. दरम्यान, जुन्या रागातून मुख्य आरोपीने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. महिलेने याआधी मुख्य आरोपीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती, त्यामुळे संतापलेल्या आरोपीने महिलेवर बलात्कार केल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.