शरीरसौष्ठव करणाऱ्यांना मेंफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या रैकेटचा भंडाफोड; इंजेक्शन च्या ९० सीलबंद बाटल्यासह एकाला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
बारामती– बारामती शहर पोलिसांनी मेंफेंटरमाईन इंजेक्शनचा अवैध साठा हस्तगेत केला आहे. या कारवाईत तब्बल ९० सिलबंद बाटल्या हस्तगत केल्या आहेत. व्यायाम शाळेत शरीरसौष्ठव करणाऱ्यांना इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून याप्रकरणी बारामती शहर पोलिसात गुन्हा दाखल करत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. बारामती शहर पोलिसांनी मेंफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनचा अवैध साठा पकडला आहे. बारामती शहरातील भिगवण रोडवरील ईलाईट जिम समोर उभ्या असलेल्या एका क्रेटा कारमधून पोलिसांनी मेंफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या तब्बल ९० सिलबंद बाटल्या हस्तगत केल्या आहेत. व्यायाम शाळेत शरीरसौष्ठव करणाऱ्यांना इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याचा संशय होता, त्यातूनच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकाला ताब्यात देखील घेतला आहे.तन्मय कल्याण बनकर याला ताब्यात घेतलं आहे तर त्याचा मित्र राहुल उघाडे हा फरार झाला आहे. बारामती शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल २९ हजार १८४ रुपये किमतीच्या मेंफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शन च्या ९० सीलबंद बाटल्या आणि ५ लाख रुपये किमतीची एक चार चाकी कार असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी जप्त केलेली इंजेक्शन संबंधित व्यक्तीने कोठून आणली ? कोणत्या उद्देशाने आणली? तो कोणाला इंजेक्शनचा पुरवठा करणार होता? या रॅकेटमध्ये आणखीन कोण कोण सहभागी आहे ? याची कसून चौकशी आता बारामती शहर पोलीस करत आहेत. बारामती शहरातील काही व्यायामशाळा मध्ये शरीरसौष्ठव करणाऱ्या तरुणांना भूलशास्त्रज्ञ प्रसूतीच्या वेळी वापरतात. मेंफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शन घेण्यासाठी काहीजण प्रोत्साहित करतात अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. मात्र ठोस असा कोणताही पुरावा समोर येत नव्हता अखेर या प्रकरणाची आता बारामती शहर पोलिसांनी भांडाफोड केला आहे.