सुनेला छळणाऱ्या पुण्यातील गायकवाड पिता पुत्रांवर १३ गंभीर गुन्हे, ३ मकोका

Spread the love

सुनेला छळणाऱ्या पुण्यातील गायकवाड पिता पुत्रांवर १३ गंभीर गुन्हे, ३ मकोका

पोलीस महानगर नेटवर्क 

पुणे – अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार दीपक साळुंके यांच्या मुलीचा सासरी छळ केल्याप्रकरणी पुण्यातील गणेश गायकवाड, त्याचे वडिल नाना गायकवाड यांच्यासह गायकवाड कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी, गणेश गायकवाड आणि नाना गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत असून कुटुंबातील इतर महिला सदस्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे पुन्हा एकदा गायकवाड प्रकरण समोर आले आहे. कारण, हगवणेंचे मामा विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडून गायकवाड पिता-पुत्राकडे तब्बल ५०० कोटींची मागणी करण्यात आल्याचा आरोप गायकवाड यांच्या वकिलांनी केल्यामुळे हे पिता-पुत्र चर्चेत आले आहेत. या दोघांवर एकूण १३ गुन्हे दाखल आहेत.

पुण्यातील सावकार नानासाहेब आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड हे सावकार आहेत. दोघेही सूनेचा छळ केल्याच्या आरोपावरुन गेली काही वर्षे तुरुंगात आहेत‌. कारागृह उपनिरीक्षक असताना जालिदर सुपेकर यांनी या बाप-लेकाकडे ५०० कोटी रुपये मागितल्याची तक्रार त्यांनी वकिलांमार्फत न्यायालयात केली होती. मुलगा गणेश गायकवाडचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेनेत गेलेल्या दिपक साळुंखे यांच्या मुलीसोबत म्हणजेच मुक्ता साळुंकेसोबत २०१७ मध्ये लग्न झालं होतं. मात्र, मुक्ताचा हुंड्यासाठी छळ होत होता, त्यावरुन २०१८ मध्ये गायकवाडांनी छळ केल्याबाबतची पहिली तक्रार दिली होती. त्यानंतर, २०२१ मध्ये मुक्ता साळुंकेने पोलिसांकडे पेटवलेल्या सिगारेटचे चटके देऊन मारहाण केल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी गायकवाड बाप-लेकांना अटक झाली होती.

३ वेळा मकोका कारवाई

नाना गायकवाडच्या सावकारीविरुद्ध अनेक जणांनी तक्रारी केल्याने त्याच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्यावर पोलिसांनी तीन मकोका कारवाई केली आहे. तसेच, येरवडा कारागृहात बंदिस्त असताना त्याच्यावर इतर कैद्यांकडून हल्ला करण्यात आला. त्यामुळे त्यांना आणि गणेशला अमरावती कारागृहात हलवण्यात आले‌ होते. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे सख्खे मावस भाऊ गायकवाडच्या वकिलाने केलेल्या दाव्यानुसार जालिंदर सुपेकर तुरुंग उपमहानिरिक्षक असताना १९ ऑगस्ट २०२३ ला अमरावती कारागृहात आले होते आणि तिथे त्यांनी गायकवाडला ५०० कोटी रुपये जामिनासाठी मागितल्याचा आरोप गायकवाडच्या वकिलांनी न्यायालयात दाखल याचिकेत केला आहे. नानासाहेब गायकवाड हे चिंचवडचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे सख्खे मावस भाऊ आहेत. गणेश आणि नाना गायकवाड या दोघांवर वेगवेगळ्या प्रकरणात एकूण १३ गुन्हे दाखल आहेत आणि ३ मकोका कारवाई आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon