आरसीबीच्या विजयी मिरवणुकीला गालबोट ! चिन्नास्वामीच्या गेटवर चेंगराचेंगरी, ११ जणांचा मृत्यू, ५० पेक्षा अधिक जखमी
पोलीस महानगर नेटवर्क
बेंगळुरू – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू च्या आयपीएल २०२५ च्या जेतेपदानंतर बंगळुरूमध्ये आयोजित विजयी रॅलीला मोठ्या दुर्घटनेने गालबोट लागले. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना बोवरिंग आणि व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने आरसीबीच्या ऐतिहासिक विजयाच्या आनंदाला गालबोट लागले आहे. ४ जून रोजी दुपारी ३:३० वाजता विजयी मिरवणूक आणि स्टेडियममधील समारंभासाठी हजारो चाहते चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमले
चाहते चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमले होते. रॅलीसाठी नियोजित खुल्या बसचा कार्यक्रम बंगळुरूच्या वाहतूक समस्येमुळे रद्द करण्यात आला, तरीही चाहत्यांनी गेट नंबर ३ जवळ प्रचंड गर्दी केली. यामुळे संध्याकाळी ५ ते ६ च्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. या घटनेत एका मुलासह ११ जणांचा मृत्यू झाला, तर जखमींना बोवरिंग आणि व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
पोलिसांनी गर्दी नियंत्रित करण्यासाठी लाठीमार केला, परंतु परिस्थिती हाताबाहेर गेली. काही चाहते गेटवर चढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. बंगळुरू पोलिसांनी चाहत्यांना लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे कार्यक्रम पाहण्याचे आवाहन केले होते, तरीही गर्दी कमी झाली नाही. ज्यानंतर मोठी दुर्घटना घडली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी शोक व्यक्त करत चाहत्यांना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जखमींची भेट घेण्याची घोषणा केली. दुसरीकडे, भाजप अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेस सरकारवर अपुऱ्या तयारीचा आरोप करत घटनेची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.