नाशिकच्या येवल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई पथकाची धडक कारवाई; सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक मुंबई यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे येवला तालुका हद्दीत असलेल्या पिंपळगाव जलाल टोल नाका परिसरामध्ये एक ऍसिड वाहतूक करणाऱ्या टँकरच्या कप्प्यामध्ये दुसऱ्या राज्यात विक्री होत असलेल्या मद्याची चोरीछुप्या पद्धतीने वाहतूक होत असून मुंबई पथकाने येवला पथकासह या ठिकाणी सापळा रचून टँकर ताब्यात घेतला.
या टँकरमध्ये परराज्यात विक्री होणारे देशी-विदेशी मद्य असा एकूण १ कोटी २१ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास येवला उत्पादक शुल्क विभाग करत आहे. दरम्यान एका आरोपीला उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.