विषारी केमिकलमुळे पर्यावरण व स्थानिक नागरिकांना जीवघेणा रोग देणारी भट्टी बंद करण्याच्या आदेशाला हरताळ, मात्र भट्टी मालकाची चंगळ
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची भट्टी मालकाकडून पायमल्ली, शासन प्रशासनाच्या डोळ्यावर गांधारीरुपी पट्टी
सबिया हुसैन शेख / प्रतिनिधी
ठाणे – ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भागात शिळ डायघर पोलिस ठाणे आणि दहिसर पिंपरी ग्राम पंचायत हद्दीतील येणारा ठाकूर पाडा या गावात डोंगर लागत आणि रहिवासी परिसरात अहमद स्टेट येथे विषारी केमिकल जाळून एल्युमिनियम बनविण्याचे काम केले जाते या भट्टी मधुन निघणार्या विषारी धुरामुळे स्थानिक लोकांना श्वास घेण्यास त्रास डोळ्यात पाणी व जळजळ होण्याचा त्रास सोबत वायू प्रदुषण होत असल्यामुळे वेळोवेळी या बेकायदेशीर भट्टी विरोधात तक्रार केल्यावर संबंधित विभागातर्फे थातूरमातूर कारवाई केली जाते, मात्र भट्टी बंद होत नाही. मागील चार वर्षांपासून वेळोवेळी या बेकायदेशीर भट्टी विरोधात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे तहसीलदार, स्थानिक ग्राम पंचायत, ग्राम सेवक, वनविभाग ठाणे तसेच स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात येत आहे मात्र अद्यापही या सर्व भट्टी विरोधात कुठल्याही विभागाने कडक कारवाई करून भट्टी बंद करून वायू प्रदुषण व स्थानिक लोकांना दमा, कॅन्सर कर्करोग सारखे रोगा पासून मुक्तता केलेली नाही.
शासन आणि प्रशासन कार्यालय संध्याकाळी कोमात, बेकायदेशीर भट्टी उशिरा रात्री बिनधास्तपणे जोमात
बेकायदेशीर भट्टी मध्ये विषारी केमिकल जाळून एल्युमिनियम बनविणारे भट्टी मालक येवढे चालाख आहे की भट्टी विरोधात कोणी तक्रार केली की एक दोन दिवस भट्टी बंद ठेवतात व जेव्हा सर्व शासन प्रशासनचे कार्यालय बंद होतात त्या नंतर अर्ध्या रात्री उशिरा हे भट्टी मालक भट्टी मध्ये विषारी केमिकल जाळून एल्युमिनियम बनविण्याचे काम बिनधास्तपणे करतात त्यांना माहीत आहे की येवढा रात्री कुठलाही विभागाचे अधिकारी भट्टीवर येणार नाही निवांतपणे भट्टीत विषारी केमिकल जाळून एल्युमिनियम बनविण्याचे काम करा व दिवसात भट्टी बंद ठेवा जेणेकरून कोणी तक्रार केली तर भट्टी बंद आहे कार्यवाही होणार नाही.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची ऐशी की तैशी, भट्टी मालकाकडून आदेश पायदळी
ठाकुर पाडा गावात डोंगर लागत तसेच रहिवासी परिसरात अहमद स्टेट येथे बेकायदेशीर अवैधरित्या विषारी केमिकल जाळून एल्युमिनियम बनविण्याचे काम बिनधास्तपणे होत आहे या बेकायदेशीर भट्टी विरोधात सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार राजकिय पुढारी आणि स्थानिक यांच्या तर्फे मागील चार वर्षांपासून तक्रार होत असून संबंधित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी या बेकायदेशीर भट्टी विरोधात वर्ष २०२१ मध्ये जिल्हाधिकारी ठाणे, तहसीलदार ठाणे, उप विभागीय अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे, कार्यकारी दंडाधिकारी ठाणे, वनविभाग ठाणे, स्थानीय ग्राम पंचायत, ग्राम सेवक सोबत स्थानिक शिळ डायघर पोलिस ठाणे यांना या बेकायदेशीर भट्टी बंद करून भट्टी मालकांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे तरी आज पर्यंत एक ही भट्टी बंद झाली नाही. संबंधित अधिकारी या भट्टी वर थातूरमातूर कार्यवाही करून आपली इति करून घेतात नंतर परिस्थिती “जैसे थे” आहे.
चार वर्षापासून भट्टी बंद करण्याचे आदेश असून मात्र भट्टी चालू कशी? बंद करणार कोण?
या गंभीर विषयावर विचार केल्यावर मोठा प्रश्न आहे की मागील चार वर्षापासून वायू प्रदुषण व स्थानिक लोकांना दमा, कॅन्सर, कर्करोग सारखे गंभीर जीवघेणे रोग पसरविणारी या बेकायदेशीर भट्टी मालकांची हिम्मत कशी आहे हे कुठल्या विभागाचे अधिकाऱ्यांशी संगनमत करून भट्टी मधुन विषारी केमिकल जाळून एल्युमिनियम बनविण्याचे काम करतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने चार वर्षापूर्वी दिलेल्या भट्टी बंद करून भट्टी मालकांवर कार्यवाही करण्याचे आदेशाची अंमलबजावणी का होत नाही? संबंधित विभागाचे अधिकारी या बेकायदेशीर भट्टी व भट्टी मालकांवर कडक कार्यवाही करून वायू प्रदुषण आणि स्थानिक लोकांना श्वास घेण्यास त्रास दमा, कॅन्सर, कर्करोग सारखे गंभीर रोगांपासून मुक्ता देणार? ही पुढच्या काळात बघण्याची गोष्ट आहे.