राज्यातील ५०० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या,३०० हून अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – राज्यातील घडामोडींना वेग आला असून महायुती सरकारकडून अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान आता महायुती सरकारकडून राज्यात अधिकाऱ्यांचा बदल्यांचा धडाका लावला आहे. राज्य सरकारकडून अनेकवेळा बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. फडणवीस सरकारकडून प्रशासनातील बदल्यांचा धडाका कायमच असून पुन्हा १३५५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
गृह खात्याने मंगळवारी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवे पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. तसेच उपायुक्त आणि समादेशक पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांचीही नवीन पदस्थापना करण्यात आली आहे. यात ३७० पोलिस निरीक्षक, ४२९ सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि ५५६ पोलिस उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या १५ दिवसतात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी बदली असल्याचे समोर आले आहे.