पोलीस परिमंडळ ६ च्या विशेष पथकाची कारवाई; २४.४७ कोटींचा एम.डी. ड्रग्ज व कच्चा माल जप्त
“नशा मुक्त गोवंडी अभियान” अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून कारवाई
रायगड (कर्जत) – येथील सावली फार्म हाऊस या ठिकाणी शेळीपालनाच्या आड अंमली पदार्थांची (एम.डी. म्हणजे मेफेड्रोन) निर्मिती करणाऱ्या टोळीवर छापा टाकून २४.४७ कोटी रुपये किमतीचा एकूण १२ किलो ६६४ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज व सुमारे १ कोटी किमतीचा कच्चा माल आणि इलेक्ट्रॉनिक प्लांटचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही टोळी फार्महाऊसच्या आड अंमली पदार्थांचे उत्पादन करत होती. विशेष पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून या ठिकाणचा पर्दाफाश केला. आतापर्यंत या प्रकरणात एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात ५ जण विक्री करणारे आणि १ जण उत्पादन करणारा आहे. या अभियानादरम्यान आजपर्यंत ७५ गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ४२.७४ कोटी रुपयांचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. परिमंडळ ६ कडून सुरू असलेले हे अभियान यशस्वी ठरत असून भविष्यातही अशी कठोर कारवाई सुरूच राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथकाचे कौतुक
वरील अंमली पदार्थ विरोधी कारवाई पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (का. व सु.) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६ श्री. नवनाथ ढवळे, तसेच सहायक पोलीस आयुक्त, ट्रॉम्बे विभाग राजेश बाबशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार, पो.नि. समशेर तडवी, स.पो.नि. मैत्रानंद विष्णु खंदारे, पो.उ.नि. सुशांत साळवी, पो.उ.नि. गणेश कचे, पो.उ.नि. अजय गोल्हार, सपो.उ.नि. विजय वाणी तसेच पो.ह. दशरथ राणे, पो.ह. पाटील, पो.ह. खैरे, पो.शि. येळे, पो.शि. केदार, पो.शि. सानप, पो.शि. राउत, पो.शि. खटके, पो.शि. भावसार, पो.शि. घारे, पो.शि. चोरगे, पो.शि. सुतार, पो.शि. कांबळे यांनी अतिशय मेहनतीने व समर्पणभावाने सहभाग घेतला. या यशस्वी कारवाईबद्दल संपूर्ण पथकाचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.