बोईसरमध्ये रासायनिक कारखान्यात निष्काळजीमुळे गॅस गळती, दहा कामगारांची प्रकृती बिघडली

Spread the love

बोईसरमध्ये रासायनिक कारखान्यात निष्काळजीमुळे गॅस गळती, दहा कामगारांची प्रकृती बिघडली

योगेश पांडे / वार्ताहर 

पालघर – पालघर जिल्ह्यातल्या बोईसरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रासायनिक कारखान्यामध्ये निष्काळजीमुळे गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दहा पेक्षा अधिक कामगारांची प्रकृती बिघडली आहे. ही दुर्दैवी घटना बोईसच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये घडली आहे. विशेष म्हणजे जेव्हा गॅस गळतीमुळे कामगारांची प्रकृती बिघडल्याचं लक्षात आलं तेव्हा या रासायनिक कारखान्याच्या मॅनेजरनं ही घटना दाबवण्याचा प्रयत्न केला असा आरोप होत आहे. या घटनेनंतर कारखान्याच्या व्यवस्थापकानं सर्व मजुरांना दुसऱ्या ठिकाणी हलवलं. मात्र जेव्हा कामगारांना तीव्र वेदना होऊ लागल्या, डोळ्यांमध्ये आणि नाकामध्ये तीव्र जळजळ जाणवू लागली, त्यांची प्रकृती खालावली तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, या कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहाणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार हा गॅस इतका विषारी होता की, या गॅसच्या संपर्कात जे मजूर आले, त्यांना तीव्र वेदना होऊ लागल्या, त्यांच्या डोळ्यात आणि नाकात तीव्र जळजळ होऊ लागली, त्यांची प्रकृती खालावली, ते जोरजोरात ओरडून लागले. सुरुवातीला या कारखान्याच्या व्यवस्थापकानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र कामगारांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, या कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं हे प्रकरण समोर आलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे कोणतीही सुरक्षिततेची काळजी न घेता या कारखान्यामध्ये धोकादायक केमिकलचं उत्पादन सुरू होतं. यामुळे पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सध्या या कामगारांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन, घटनास्थळाची पाहाणी केली. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यामुळे कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कोणतीही सुरक्षेची काळजी घेण्यात आली नव्हती अशी माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon