१० एकर जमीन घोटाळा; वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल; पुणे पोलीस दलात खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेसोबत मटण पार्टी केल्यामुळं पोलिसांवर कारवाई केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता जमिनीच्या वादात आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी पुणे पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र लांडगे यांच्यासह चार जणांच्या विरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील वाघोली येथील १० एकर जमिन हडपण्याचे उद्देशाने संगनमत करून फौजदारीपात्र रचून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता बनावट महिला उभी करून ती मूळ जमिनीची मालक असल्याच्या भासविण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यवसायाशी देखील हे प्रकरण संबंधित असल्याचे बोलले जाते आहे. आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे, राजेंद्र लांडगे, अपर्णा यशपाल वर्मा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चंदननगर पोलिसांचे एक तपास पथक आता या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत आहे. वाघोली येथील १० एकर जमिन हडपण्याच्या उद्देशाने संगनमत करून फौजदारीपात्र रचून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता बनावट महिला उभी करून ती मूळ जमिनीची मालक असल्याच्या भासवण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी तपास पथक स्थापन केलं असून, संबंधित प्रकरणाशी मुळाशी जाण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. बनावट कागदपत्रे, आर्थिक व्यवहार यांचा तपास करण्यावर पोलिसांचा भर आहे. पुणे शहरातील चंदननगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस अधिकारी संतोष लांडगे यांच्यासह चौघांवर फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोली येथील तब्बल १० एकर जमिन हडपण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार करून, बनावट महिला उभी करून तिला मूळ मालकिणीच्या स्वरूपात सादर केल्याचा आरोप या आरोपींवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा सहभाग समोर आल्याने पुणे पोलिस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. शहरात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाचा पारदर्शक तपास करण्याचे आश्वासन दिले असून, लांडगे आणि इतर आरोपींवर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या गंभीर प्रकरणाने पोलिस यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.