१५ एकर जमीन हडपण्यासाठी तो बनला आयएएस अधिकारी; सफाळे पोलीसांनी तोतयेगिरी करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या

Spread the love

१५ एकर जमीन हडपण्यासाठी तो बनला आयएएस अधिकारी; सफाळे पोलीसांनी तोतयेगिरी करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

पालघर – पालघरमधील सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयएएस अधिकारी असल्याचं दाखवून जमीन हडपण्याचा प्लान महसूल विभागाच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आला आहे. सफाळे येथे जमिनीचा फेरफार नावावर करण्यासाठी कागदपत्रे दाखल करतेवेळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत सफाळे पोलीस ठाण्यात तोतयेगिरी करणारा आयएएस अधिकारी प्रतीक मोहन पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सफाळे येथील मंडळ अधिकारी तेजल पाटील यांनी सफाळे पोलीस ठाण्यात जयवंत दांडेकर यांच्या मालकीच्या १५ एकर जागेवर बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या घटनेबाबत पोलिसांनी तपास करीत प्रतीक पाटील याला चिंचणी येथून ताब्यात घेत सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सफाळे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असल्याचं खोटं भासवून सफाळे मंडळ अधिकारी येथे फेरफारसाठी प्रतीक पाटील यांनी कागदपत्रे दाखल केले असताना आयएएस अधिकारी असल्याचं सांगितलं. मंडळ अधिकारी तेजल पाटील यांना तपास केल्यानंतर कागदपत्रांमध्ये फेरफार असल्याचे जाणवले. याबाबत त्यांनी संबंधित जमीन मालक जयंत दांडेकर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कोणतंही खरेदी खत दिले नाही असे सांगितले. याबाबतचा संशय आल्यामुळे मंडळ अधिकारी यांनी खबरदारी घेत चौकशी केली असताना त्या कागदपत्रात फेरफार केल्याचं आढळून आलं. तेजल पाटील यांनी सफाळे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यात आली. त्याचप्रमाणे जयवंत दांडेकर यांच्या मालकीची १५ एकर जागेचे बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. सदरच्या घटनेबाबत पोलिसांनी तपास करीत प्रतीक पाटील याला चिंचणी येथून ताब्यात घेत सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सफाळे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon