लग्नाचे आमिष दाखवून तब्बल एक वर्ष तृतीयपंथी महिलेचे शारीरिक शोषण करणाऱ्या नितीन सोळंके उर्फ भाया वर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

लग्नाचे आमिष दाखवून तब्बल एक वर्ष तृतीयपंथी महिलेचे शारीरिक शोषण करणाऱ्या नितीन सोळंके उर्फ भाया वर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

वर्धा – पेशाने वकील असलेल्या तृतीयपंथी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल एक वर्ष तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या तसेच, तिला प्रेमापोटी वारंवार पैशाची मागणी करून इमोशनल ब्लॅकमेल करणाऱ्या नितीन सोळंके उर्फ भाया वर रामनगर पोलिसांनी ९ मे रोजी गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी फरार असून पुढील तपास चालू आहे. नितीन हा कोर्टाच्या कामानिमित्त तृतीयपंथी महिला वकीलासोबत ओळख झाल्यानंतर तिची सुंदरता बघून तिच्याशी जवळीक साधण्याचा त्याने प्रयत्न केला. काही महिन्यानंतर स्वालंबी ग्राउंड मध्ये पुन्हा त्यांची भेट झाल्यानंतर दोघांमध्ये बोलचाल वाढली. नितीन ने तृतीयपंथी असलेल्या वकील ला पर्सनल लाईफ बद्दल विचारले असता तिने सिंगल असल्याचे सांगितले यावर नितीन ने “तू एकटी कधीपर्यंत राहशील तुला कधी तर तुझा पार्टनर बघावा लागेल “, ” मला तू खूप आवडतेस मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, तुला मुलं होऊ शकत नाही पण लग्नानंतर आपण एखादा मुलगा दत्तक घेऊया ” असे म्हटले.

दहा वर्षा अगोदर नितीन चे लग्न झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशीच त्याची पत्नी त्याला सोडून गेली, ही कहाणी तिच्यासमोर सांगितल्यामुळे ती भावुक झाली व दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले आणि त्यांच्यात शारीरिक संबंध होत गेले. नीतिन एकटा राहत असल्याचे तिला समजल्यावर ते दोघेही जण पती-पत्नी प्रमाणे राहू लागले.

नितीन हा बँकेमध्ये डेली कलेक्शनचे काम करत असून त्याला महिन्याचे फक्त ८,५००/- रुपये मिळतात, त्यातही त्याला रोज दारू पिण्याचे व्यसन आहे. तिची कमाई चांगली आहे हे बघून तिला वारंवार दारू पिण्याकरिता नितीन हा पैशाची मागणी करत होता, प्रेमापोटी तिने पैसेही त्याला देऊ केले. मोबाईल घेण्याकरिता, तर कधी गाडी घेण्याकरिता तिला पैशाची मागणी करत होता तरीही ती प्रेमापोटी त्याला पैसे देत गेली. त्याच्या या त्रासाला कंटाळून तिने त्याला पैसे देणे बंद केले, नंतर जानेवारी २०२५ मध्ये तिने नितीन ला लग्न करिता विचारले असता त्याने ” तू मला पैसे देऊ शकत नाहीं मला सांभाळू शकत नाही तर मी तुझ्याशी लग्न कशाला करू” असे उत्तर दिले.

हे एकूण तिला धक्का बसला व ती डिप्रेशन गेली कारण नितीन ने लग्नाचे आमिष दाखवून तब्बल १ वर्ष तिचे शारीरिक शोषण केले होते. याच कारणामुळे तिने नितीन सोबत सर्वच प्रकारचे संबंध कायमचे तोडले होते. तरीही नितीन तिच्या घरी दारू पिऊन जबरदस्ती घुसला व तिला अश्लील शिवीगाळ करू लागला, तिला अनेक ठिकाणी अडवून परत संबंध ठेवण्याकरिता तो तगादा लावत होता. १९ मार्च २०२५ रोजी ला सायंकाळी साडे सातच्या दरम्यान स्वावलंबी ग्राउंडवर नितीन ने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता तिने आजपर्यंत दिलेले ९५ हजार मला कधी परत करशील असे विचारले असता त्याने “मी तुला पैसे तर परत करणार नाही पण तुले चाकू मारून देईन, तुले जे कराच हाये ते करून घे” असे उत्तर दिले. आणि अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून नितीन च्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon