अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षे चिमुकल्याचं अपहरण; अपहरण करणाऱ्या टेम्पो चालकाला संतप्त नागरिकांनी चोप देत दिले पोलिसांच्या स्वाधीन

Spread the love

अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षे चिमुकल्याचं अपहरण; अपहरण करणाऱ्या टेम्पो चालकाला संतप्त नागरिकांनी चोप देत दिले पोलिसांच्या स्वाधीन

योगेश पांडे / वार्ताहर 

छत्रपती संभाजीनगर – घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षे चिमुकल्याचं अपहरण करण्यात आल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली आहे. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी शोधाशोध करत आयशर चालकाला कोपरगाव तालुक्यात पकडले. अपहरण करणाऱ्याला संतप्त नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. याप्रकरणी आरोपी आयशर चालकाविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजीराव भानुदास करंदीकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील लाडगाव या गावात रस्त्यालगत माधुरी फुलणारे या पती, सासू, मुलगा व आई यांच्यासह राहतात. दरम्यान शनिवार दि. १० मे रोजी माधुरी फुलणारे या घरातील काम आवरत असताना त्यांचा तीन वर्षाचा मुलगा कुणाला हा घराच्या अंगणात खेळत होता. यावेळी माधुरी यांच्या आई लताबाई या मुलावर लक्ष ठेवत होत्या. लताबाई या काही कामानिमित्त क्षणभरासाठी बाजूला जाताच अंगणात खेळत असलेल्या कुणाल अचानक गायब झाला. कुणालचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही. यावेळी शेजारी कविता शिंदे यांनी सांगितले की एका व्यक्तीने कुणालला जबरदस्तीने ट्रकमध्ये टाकून नेले.

या घटनेची माहिती तातडीने वैजापूर पोलिसांना देण्यात आली. गाडी कोपरगावच्या दिशेने गेल्याचे लक्षात आल्यानंतर लताबाई यांनी कोपरगाव येथील नातेवाईक गणपत यांना ही माहिती फोनवरून कळवली. गणपत यांनी तातडीने नागरिकांच्या मदतीने वैजापूर रोडवर धाव घेतली. लताबाईने सांगितलेल्या वर्णनानुसार एम.एच.१४ बी.जी.४१३२ क्रमांकाचे वाहन दिसताच वाहन थांबवण्यात आले. यावेळी ट्रकमध्ये असलेल्या कुणालला सुखरूप बाहेर काढण्यात आले. ट्रक चालकाकडे विचारपूस केली असता तो मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. संतप्त नागरिकांकडून ट्रक चालकाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon