रायगडमध्ये भीषण अपघात ! ट्रेलर आणि एसटी बसची जोरदार धडक; चार जणांचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड– रायगडच्या तळा तालुक्यात भीषण अपघात घडला आहे. ट्रेलर आणि एसटी बसची जोरदार धडक झाली. हा अपघात गुरुवारी दुपारी घडला या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० पेक्षा अधिकजण जखमी झाल्याचे समजते. तळयाकडून अगरदांडयाच्या दिशेने निघालेल्या ट्रेलरने रहाटाड कडून येणाऱ्या एसटीबसला जोरदार धडक दिली. तारणे येथील तीव्र वळणावर हा अपघात घडला आहे. अपघात एवढा भयानक होता की, एसटी बस एका बाजूने पूर्णपणे चिरली गेली. सदरच्या अपघाताची नोंद तळा पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालय दाखल करण्यात केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तृप्ती विजय खुटीकर (२२),लक्ष्मण राया ढेबे (३८),अनन्या कपेश गमरे (७) आणि विठ्ठल धोंडू कजबते (५५) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रवाना केले आहेत.
तर, काशिनाथ जानू ढेबे (५२), सविता शांताराम गायकवाड (४५),यशवंत नारायण रामाणे (७७), लक्ष्मण नाग्या घायरी (६०),सविता शांताराम गायकवाड तंग (४५), वैष्णवी विजय फुटेकर (२५), ससुबाई तुकाराम गायकवाड (२५),जयश्री नामदेव गवाणे (६०), संगीता अंकुश जाधव (४०) आणि मोरेश्वर ढेबे (१९) हे गंभीर जखमी झाले आहेत.