करमाळ्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, ३ तरुणींना डांबून ठेवत सुरू होता विकृत धंदा
योगेश पांडे / वार्ताहर
सोलापूर – सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. करमाळा तालुक्यातील वीटमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापेमारी करत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. संतोष जगदाळे असं अटक केलेल्या ४१ वर्षीय आरोपीचं नाव असून तो वीट येथील रहिवासी आहे. आरोपी संतोष जगदाळे हा काही तरुणींना डांबून ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता, अशी माहिती समोर आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
या घटनेची अधिक माहिती देताना करमाळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीट गावात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल साईलीलाच्या पाठीमागे असेलल्या पाझर तलावाजवळ एका व्यक्तीने काही खोल्या बांधल्या आहेत. या खोल्यांमध्ये आरोपीनं काही तरुणींना डांबून ठेवलं आहे. आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे करमाळा पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहितीची शाहनिशा केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापेमारी केली. यावेळी पोलिसांनी वेश्या व्यवसायात गुंतलेल्या तीन तरुणींची सुटका केली. तर हा कुंटनखाना चालवारा आरोपी संतोष जगदाळे यास अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला सात मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.