दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने फिर्यादीच्या मुलीचा केला खून; महात्मा फुले चौक पोलिसांकडून आरोपींच्या आवळल्या मुसक्या
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – इंदिरानगर परिसरात राहणारे निसार सैय्यद नजीर सैय्यद हे दि.०५/०५/२०२५ रोजी रात्री जेवण करीत असताना गुलाम सुभानी शेख उर्फ मुन्ना हे त्यांच्या घरी येऊन दारूसाठी पैशांची मागणी केली असता निसार सैय्यद नजीर सैय्यद यांनी पैसे देणास नकार दिल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला. या घटनेचा राग मनात धरून गुलाम सुभानी शेख उर्फ मुन्ना यांचा मुलगा अब्दुल रहेमान गुलाम सुभानी शेख, व इंदीरानगर भागत राहणारे त्याचे मित्र आरोपी नं.३) शोएब रहिम शेख, ४) अजिज इब्राहिम शेख, ५) शाहिद युसुफ शेख वय अंदाजे २० ते २२ वर्ष, यांनी एकत्रितपणे फिर्यादीच्या घरात घुसून आरोपी अब्दुल रहेमान शेख याने ‘ए इधर आओ मेरे अब्बा को क्यो मारा’ असे बोलून चौघांनी फियादीस ठोशा बुक्यांनी मारहाण केली व फिर्यादीची पत्नी व मुलगी सानिया हे फिर्यादीस सोडविणेसाठी गेली असता आरोपीनी त्यांचे हातातील लाकडी दांडक्यांनी फियादी व त्यांची पत्नी व मुलगी यांना मारहाण करून गंभीर दुखापत केली व फिर्यादीची मुलगी सानिया मोइन बागवान, वय-१९ वर्षे हिच्या डोक्याच मागील बाजूस लाकडी दांडक्याने जोरात फटका मारून गंभीर दुखापत करून तिला जिवे ठार मारले म्हणून सदर घटने बाबत महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे ४८३/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चेक कलम १०३(१),१८९(२),१९१(२), १९१(३),१९०, ३३३, ११८(१), ११५(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हयातील आरोपी गुलाम सुभानी शेख उर्फ मुन्ना, वय-४५ वर्षे, अब्दुल रहेमान गुलाम सुभानी शेख, वय-२० वर्षे, शोएब रहिम शेख, वय-२३ वर्षे, अजिज इब्राहिम शेख, वय-२३ वर्षे व शाहिद युसुफ शेख, वय-२० वर्षे यांना तात्काळ अटक करण्यात आली. सदर उत्कृष्ठ कामगिरी अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, अतुल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग, कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि ज्ञानेश्वर साबळे, पोनि (गुन्हे) नाईक, पोनि (प्रशासन) नांगरे यांनी वरील नमुद गुन्हयात गुन्हे शोध पथकाचे अधिकारी, अं