माझगावमध्ये मुन्ना हाजी- सना या ड्रग्ज माफिया पती-पत्नीकडून एम.डी. ड्रग्जची खुलेआम विक्री
ड्रग्जमुक्त मुंबईचे तीन तेरा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वप्नाला सुरुंग
मुंबई – माझगाव भागातील जे.एम. राठोड मार्गावर, हेमिल्टन रेसिडेन्सी टॉवरसमोरील लाल रंगाच्या सार्वजनिक शौचालयासमोर मुन्ना हाजी उर्फ बंगाली बाबू, त्याची पत्नी सना, आई जुबेधा, सासू शबाना, मेहुणी शमा, वर्कर पीयूष आणि इतर ५ जण रोज खुलेआम एम.डी. ड्रग्सची विक्री करतात.
हे ड्रग्सचे दुकान सकाळी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ७ पर्यंत सुरू राहते. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना रात्री सहजपणे ड्रग्स मिळतो. कधी मुन्ना-सना मिळून, तर कधी त्यांच्या घरातील महिला किंवा वर्कर लोक हे ड्रग्स विकतात. ग्राहक ८३६९८९७४९९ या नंबरवर संपर्क केल्यावर इच्छित स्थळी वर्कर पीयूष ड्रग्स पोहोचवला जातो. याची शहानिशा करण्यासाठी दैनिक पोलिस महानगर व डेली मराठी न्यूज टीमने बनावट ग्राहक पाठवून १५ दिवस व्हिडीओ शूट केला, ज्यात हे सगळं स्पष्ट दिसत होतं. सदर व्हिडीओ थेट पोलीस उपायुक्त एएनसी श्री. श्याम गुगे यांना दिला. त्यांनी एक युनिटला कारवाईचे आदेश दिले, पण १० दिवस उलटून गेले तरी अजून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
एएनसीचा एक अधिकारी सांगतो की, रात्री महिला आरोपींना पकडणं कठीण आहे, आणि जरी पकडलं तरी १०-२० ग्रॅम एम.डी.मुळे ते लगेच जामिनावर सुटतात.
साकिनाका पोलिसांनी ३ दिवसांपूर्वी ३० ग्रॅम एम.डी.सह एक आरोपी पकडून, त्यांच्याकडून शोधून करोडोंच्या एम.डी. ड्रग्स बनवणारी फॅक्टरी उध्वस्त केली.
मग एएनसी टीम हात हलवत का बसली आहे?
हे माफिया पती-पत्नी लाखोंची पार्टी करतात, पण प्रत्यक्षात
दिसायला गरीब वाटत असले प्रत्यक्षात ड्रग्स विकून बक्कळ पैसा कमावतात. सदर ड्रग्स विकतानाचा संपूर्ण व्हिडीओ सादर करून सुद्धा उपायुक्त आणि पोलिस युनिटलाही दिला असून,अजूनही कारवाई नाही. मुंबई पोलिसांना नवीन सिंघम पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती लाभलेले असून आतातरी अशा ड्रग्स माफियांवर कारवाई करतील.