मेट्रोच्या खड्ड्यात पडून ८ वर्षीय बालकाचा मृत्यू
रवि निषाद/मुंबई
मुंबई – मानखुर्द परिसरात व मानखुर्द पोलीस ठाणे हद्दीतील सोनापूर परिसराच्या समोर सायन पनवेल नॉर्थ वाहिनीवरील सर्विस रोडच्या डाव्या बाजूस मेट्रोच्या कामाकरीता खोदलेल्या खड्ड्यामधील साठलेल्या पाण्यामध्ये एक नऊ वर्षांचा मुलगा बुडालेला असल्याबाबत पोलिसांना कॉल प्राप्त होता. फायर ब्रिगेडच्या मदतीने मुलगा आर्यन विश्वनाथ निषाद, ८ वर्षे याचा शोध घेतला असता तो पाण्यात बुडालेल्या अवस्थेत मिळून आला. त्यास तात्काळ मानखुर्द पोलीस ठाण्याच्या वाहनाद्वारे राजावाडी रुग्णालय नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले आहे. मयत मुलगा हा खेळत असताना पाय घसरून खड्ड्यामध्ये पडला असल्याबाबत प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले होते. सदरबाबत अपमृत्यु नोंद करून पुढील कारवाई मानखुर्द पोलिस करत आहेत असे सांगण्यात येत आहे.