पोलीस उपायुक्त परिमंडळ – ७ च्या हद्दीतील ५ गुन्हेगारांना मुंबईतून तडीपार
रवि निषाद/मुंबई
मुंबई – पोलीस उपायुक्त परिमंडळ- ७ अंतर्गत येणाऱ्या पोलिस ठाणे हददीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे, वारंवार गुन्हे करुन सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आणणारे गुन्हेगार तसेच अवैध धंदे व बेकायदेशीर कृत्य करणारे गुन्हेगार तसेच सराईत गुन्हेगार यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या अनुषंगाने परिमंडळ – ७ मध्ये येणाऱ्या पोलीस ठाणेतील ५ सराईत गुन्हेगारांना हददपार करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांनी २३ एप्रिल, २०२५ रोजी ही कारवाई केली आहे.
पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५६ अन्वये करण्यात आली. परिसरात सक्रीय असलेले घाटकोपर पोलिस ठाणे हददीतले किरण सुधाकर तोंडसे (३१), कांजुरमार्ग पोलिस ठाणे हददीतील जीजाबाई अशोक जाधव (६०),आशा काशीनाथ माने उर्फ़ आशा सुरेश गोस्वावी (६०) आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ अन्वये सक्रिय असलेले भांडुप पोलिस ठाणे हददीतील जियाउद्दीन मुनीर अंसारी उर्फ़ लालू (२६) आणि फिरोज मुनीर अंसारी उर्फ़ ईददू (२१) अशा एकूण ५ सराईत गुन्हेगारांना हददपार करण्यात आले आहे. सदर उत्तम कामगिरी मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर,विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, पोलिस सह आयुक्त, कायदा सुव्यवस्था श्री सत्यनारायण चौधरी, अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग डॉ.महेश पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी केली आहे.