कल्याणच्या ताल बारवर पोलिसांची धाड, २२ नर्तकी, व्यवस्थापकासह वेटर व ग्राहकांवर कारवाई

Spread the love

कल्याणच्या ताल बारवर पोलिसांची धाड, २२ नर्तकी, व्यवस्थापकासह वेटर व ग्राहकांवर कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – कल्याण पश्चिम परिसरातील रामबाग येथील ताल बारवर महात्मा फुले चौक पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई करण्यात आली. याबाबत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दिपक पोपट थोरात वय ३४ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं. ४२८/२०२५, भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३ कलम २९६,५४,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये व्यवस्थापक अरूण सदांनद शेटट्टी वय ४८ वर्षे, राह. गोमती निवास रूम नं. ४७, पळवडनगर, जुना पार्सपोर्ट ऑफीस जवळ, ठाणे, रोखपाल लवकुश दिलीपकुमार शर्मा वय ३२ वर्षे, राह. रांजनोलीगांव, साईधाम बिल्डीग, भिवंडी बायपास भिवंडी, म्युझिक ऑपरेटर: संजय नामदेव कल्याणकर वय ४२ वर्षे, राह. वाडेघर देवानंद भोईर चाळ, कल्याण, पुरूष वेटरांमध्ये आदर्श श्रीतेजबान गुप्ता, वय २१ , मंजा देवराम गोवडा वय ४५ वर्षे, नागराज मेरी गौडा वय ५० वर्षे व योगेश शिवाजी शिर्के वय ४१ वर्षे यांचा समावेश आहे तसच नर्तकीवर पैसे उधळणाऱ्या १५ ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले. याशिवाय अश्लील हावभाव व तोकडे कपडे परिधान करून ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या २२ नर्तकी व महिला गायक यांना देखील ताब्यात घेण्यात आले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९/०४/२०२५ रोजी कल्याण या ठिकाणी “या बारचे मॅनजर महिला सिंगर, म्युझिक ऑपरेटर, पुरुष वेटर यांनी आपसात संगनमत करून बारमध्ये “दो घुट मुझे भी पिलादी शराबी देख फिर होता है क्या” हे हिंदी गाणे वाजवुन बारमधील महिला सिंगर यांनी तोकडे कपडे घालून अश्लिल हावभाव व विभत्स वर्तन करुन बारमधील गि-हाईकांना आकर्षित करीत ग्राहक हे त्यांचे जवळील पैसे उधळत असल्याचे दिसून आले. बारमध्ये अश्लिल वर्तन करीत असताना एकूण २२ महिला १५ पुरुष, ४ वेटर,१ रोखपाल, १ म्युझीक ऑपरेटर १ मॅनजर असे समक्ष मिळून आल्याने त्यांच्याविरुष्ट भा.न्या. संहिता कलम २९६,५४,३ ५ प्रमाणे सरकार तर्फे फिर्याद देण्यात आली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक अस्लेशा पाटगे, प्रतिभा माळी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरीक्षक ढोके,(मानपाडा पोलीस स्टेशन), पोलीस विकास मडके, पोलीस हवा. पोलीस नाईक सूर्यवंशी, पोलीस शिपाई, खुशाल नेरकर, राहुल शिंदे, अमित शिंदे यांनी उत्तम कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon